पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश गाजरे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माळरानावर लवकरच वन विभागाच्या माध्यमातून २ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
म्हसोबा झाप ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश गाजरे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून म्हसोबा झाप ग्रामपंचायतीच्या माळरानावर वर "लोकनेते आमदार निलेश लंके वनराई" विकसित करण्यात येणार आहे.
नाबार्डच्या माध्यमातून गावात ज्या ठिकाणी सीसीटीची कामे झालेली आहेत त्या ठिकाणी आपण सध्या ५००० झाडांची लागवड करणार आहोत. आज अखेर वनविभागाकडून ५० हजार झाडे व ५० हजार बियांची लागवड झालेली आहे. लवकरच कन्हेर पोखरीचा ११४ एकर माळरानावर १ लाख वृक्षांची लागवड ही करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी उत्पादित फळझाडे सीताफळ, चिंच, जांभूळ, बोर, आंबा यांचीही लागवड करण्यात येणार आहे.-सरपंच प्रकाश गाजरे
सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हसोबाझाप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सबंधित वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी केली यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात चराईबंदी व कुऱ्हाडबंदीचा निर्णय घेऊन माळरानावर वनराई विकसित करून दोन लाख वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणार असून त्या माध्यमातून ग्राम विकासालाही चालना मिळणार आहे.
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून म्हसोबाझाप ग्रामपंचायतीच्या माळरानावर वर विकसित होणार वनराई
वन विभागाच्या माध्यमातून करणार २ लाख वृक्षांची लागवड !
वृक्षलागवडीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळणार चालना
म्हसोबा झाप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश गाजरे आपल्या आदिवासी भागांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. आपल्या ग्रामपंचायत च्या माळरानावर ते आता दोन लाख झाडांची लागवड करून ग्रामविकासाला त्या माध्यमातून चालना देणार आहेत. वृक्ष लागवड करून ते म्हसोबाझापच्या माळरानावर वनराई विकसित करणार आहे. वृक्षलागवडीच्या माध्यमातून निसर्गाचा होत असलेला ऱ्हास भरून काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद