कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील ४३ गावे पूर्णतः बंद जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची माहिती

0

पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यात वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भोसले यांनी पारनेर तालुका दौरा केला या दौऱ्या संबंधी पारनेर तालुक्यात वाढत असलेला कोरोना व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके,  जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावचे सरपंच, सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली. या मिटिंग मध्ये पारनेर तालुक्यातील जनतेने स्वतःहून लॉकडाऊन करून घ्यावे व दिनांक ३१ जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत तालुक्यातील ४३ गावे पूर्णतः बंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण गावाची कोरोना टेस्ट करून पॉझीटीव्ह येणाऱ्या कोरोना पेशंटला कोविड सेंटर येथे उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थ, राजकारणी, कार्यकर्ते यांनीही नियमांचे पालन करावे. तसेच लग्न समारंभ, उद्घाटन, मोर्चे, उपोषण यांसारखे सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ५० लोकांची परवानगी देण्यात आली आहे. तर राजकीय कार्यक्रम यासाठी २५ लोकांची परवानगी देण्यात आली आहे. तर हे नियम मोडणारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. कार्यालय बंद करून त्या ठिकाणच्या आस्थापना बंद करून कोरोना संपेपर्यंत सील करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी टाकळी ढोकेश्वर येथे पत्रकार यांच्याशी बोलताना दिली. 

तसेच लवकरात लवकर पारनेरकरांनी स्वतः लॉकडाऊन लावून पारनेर तालुक्यातील कोरोणा पेशंटची संख्या कमी करून अहमदनगर जिल्ह्याची महाराष्ट्रात एक नवीन ओळख तयार करावी असे बोलताना सांगितले.  यावेळी पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे, प्रांत अधिकारी  सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top