रेनवडी गांंवचे सरपंच श्रीकांत डेरेंच्या वाढदिवसानिमीत्त वृक्षारोपन व पत्रकारांचा सन्मान...

0

पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील रेनवडी या गांंवचे सरपंच श्रीकांत डेरे यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमीत्त रेनवडी ग्रामपंचायतने अनावश्यक खर्च टाळत वृक्षारोपण व कोरोना काळामधे चांगली कामगीरी बजावणार्‍या पत्रकारांचा सन्मान करत एक अनोखा उपक्रम राबविला. यावेळी ग्रामस्थ व पत्रकारांनी श्रीकांत डेरे यांचा सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाचे जिल्हासचिव तथा तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे, निलेश लंके प्रतिष्ठाण चे युवा तालुकाध्यक्ष विजय औटी, पाडळीचे सरपंच भाऊसाहेब डेरे, काठापूरचे सरपंच दस्तगीर मुजावर, ग्रामसेवक प्रविण खराडे, पत्रकार संजय मोरे आदींनी सरपंच डेरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे पार्श्वभूमीवर कुठलाही गाजावाजा न करता अनावश्यक खर्च टाळत मान्यवरांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे, विनोद गायकवाड, शिरीष शेलार, बाबाजी वाघमारे, संतोष सोबले, राम तांबे, सागर आतकर, संदिप गाडे, आनंदा भूकन, विजय रासकर, संपत वैरागर, सुभाष भामरे, स्वप्निल भालेराव, चंद्रकांत कदम, श्रीनिवास शिंदे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच कांचन बाबासाहेब येवले,सदस्य दत्ता येवले, सत्यभामा येवले,विजय पडवळ,किरणशेठ ढोमे, ग्रामसेवक मिना काळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता येवले यांनी तर सुत्रसंचालन राजेंद्र येवले यांनी केले.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top