ठेकेदारला प्रशाकीय अधिकार्‍याचे पाठबळ... ठेकेदारापुढे पळशी उपसरपंच हतबल..

0

पारनेर/प्रतिनिधी: तालुक्यातील पळशी ते माळवाडी या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सहा किलोमीटर रस्त्याचे काम काहीच महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. परंतु कामाच्या निकृष्ट दर्जामुळे काही दिवसातच रस्ता उखडला असल्याने रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संबंधित ठेकेदार याला ग्रामपंचायतने सूचना देऊनही रस्त्याची दुरुस्ती ठेकेदाराने केली नाही. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाबाबत पळशी गावचे उपसरपंच आप्पासाहेब शिंदे यांनी सरकारच्या "आपले सरकार" पोर्टलवर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडेही तक्रार केली होती. परंतु तेथूनही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने पळशी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा मुजोर ठेकेदारावर प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. जर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही उपोषण करू असा इशारा पळशी गावचे उपसरपंच आप्पासाहेब शिंदे व ग्रामस्थ यांनी प्रशासनाला दिला आहे.

ठेकेदार याला अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने ठेकेदार अरेरावीची भाषा करत आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा उपोषण करू- आप्पासाहेब शिंदे( उपसरपंच )


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top