पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे तालुका शिवसेनेच्यावतीने डोळे तपासणी शिबीर व मोफत औषध वाटप करण्यात आले

0

पारनेर/ प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्याचे माजी आमदार व विधान सभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण पारनेर तालुक्यात डोळे तपासणी शिबीर व मोफत औषध वाटप करण्यात आले आहे. तर पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी गोरेगाव येथील वयोवृद्ध ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. अतिशय मुबलक दरात चष्मा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सरपंच सुमन बाबासाहेब तांबे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व नामदार विजयराव औटी तसेच पारनेर तालुका शिवसेना प्रमुख यांचे आभार मानले. व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून असेच सामाजिक कार्यक्रम करत राहो आशा शुभेच्छा दिल्या. यावेळी गोरेगाव येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नामदार विजयराव औटी, भाऊ कोरगावकर, शिवसेना पारनेर तालुका प्रमुख विकास रोहोकले यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सरपंच सुमन बाबासाहेब तांबे, उपसरपंच शिवराम नामदेव नरसाळे, दादाभाऊ नरसाळे, सुरेश पठारे, दामू नरसाळे, दत्तू गिरी, भाऊसाहेब शेळके, दयानंद खेनंत, राजू पठाण, रेवजी मोरे गुरुजी, बबन नरसाळे, कुंडलिक पानमंद, मुक्तजी गोरे, बनशी शेलार, रमेश नरसाळे, गोरख नरसाळे, शांताबाई नरसाळे, शिंधुबाई नरसाळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top