पारनेर/प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्याचे माजी आमदार व विधान सभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण पारनेर तालुक्यात डोळे तपासणी शिबीर व मोफत औषध वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी ग्रामपंचायत उपसरपंच संदीप ठुबे यांच्या हस्ते नारळ वाढून करण्यात आली. या शिबिरासाठी भाळवणी गावातील वयोवृद्ध ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. अतिशय मुबलक दरात चष्मा वाटप करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे तपासणी शिबीर सुरू झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील गरीब व गरजू लोकांना याचा फायदा होणार आहे. ज्या ग्रामस्थांना डोळे तपासणी आणि त्यासाठी आवश्यक गोष्टी घेण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाही त्यांना या शिबिराचा मोठा आधार मिळाला आहे.- उपसरपंच संदीप ठुबे
यावेळी भाळवणी येथील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नामदार विजयराव औटी, भाऊ कोरगावकर, शिवसेना पारनेर तालुका प्रमुख विकास रोहोकले यांचे आभार मानले. तर या कार्यक्रमासाठी शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, सरपंच लिलाबाई भाऊसाहेब रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, माजी उपसरपंच कमलाबाई चेमटे, सुरेश रोहोकले, झुंबर रोहोकले, किसन साठे, बाळासाहेब रोहोकले, प्रकाश रोहिकले, लक्ष्मण चेमटे, बाबासाहेब पटेकर, सीताराम रोहोकले, मंजाभाऊ रोहोकले आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद