पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसाठी पारनेर तालुका शिवसैनिक यांच्याकडून एक मदतीचा हात म्हणून धान्य व रोज उपयोगी वस्तू पारनेर येथून पाठवण्यात आला. या पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवस साजरा न करता महाराष्ट्रवर ओढवलेल्या पुराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पारनेर तालुका शिवसेना कार्यकर्त्यांकडून हा छोटासा मदतीचा हात आम्ही देत आहोत. व भविषात पारनेर तालुक्यातील सर्व शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी शक्य होईल ती मदत पारनेर येथे येत्या दोन दिवसात आणून देण्याचे आव्हान अहमदनगर जिल्हा परिषद चे कृषी बांधकाम विभाग सभापती काशीनाथ दाते यांनी बोलताना सांगितले. तर या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले, शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, युवा नेते अनिकेत दादा औटी, विजय डोळ, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, नगराध्यक्ष वर्षा नगरे, युवराज पठारे, संतोष येवले, रवींद्र चौधरी, सतीश औटी,रामदास औटी, संदीप मोढवे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद