हार्दिक पांड्याच्या हातातील घड्याळ पाहिलात का किम्मत ऐकून हैराण व्हाल

0

भारतीय क्रिकेट संघ म्हटलं कि आपल्याला सुरुवातीला आठवणारी काही नावं म्हणजे कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर इ. हि सर्व मंडळी जरी आता क्रिकेट खेळत नसली तरी त्यांनी जे विक्रम केलेत. ते प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात असतील आणि आहेतच. परंतु हल्ली ज्या एका खेळाडूच्या व्हायरल होणार्‍या फोटोने सर्वांचे लक्ष वेधलं आहे, तो म्हणजे हार्दिक पंड्या. हार्दिक पंड्या हा तरुण अष्टपैलू क्रिकेटपटू हा तुम्हाला आवडत असेलच. त्यामुळे आज आपल्या आवडत्या अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या विषयी खास व्हायरल फोटो विषयी सांगणार आहे. हार्दिक पांड्याच्या एका फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे आणि तो फोटो म्हणजे त्याच्या हातातील घड्याळाचा.


हार्दिक पांड्याने आपल्या हातात घातलेल्या घड्याळाची किंमत कोट्यवधी रुपये आहे.


हार्दिक पांड्याने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या काही फोटोंसह मनगटावरील घड्याळाचाही फोटो शेअर केला आहे. माहितीनुसार या घड्याळाची किंमत किमान पाच कोटी रुपये असेल, असा अंदाज आहे.

हार्दिकचे हे फोटो परदेशातील असून त्याने टँक टॉप, समर हॅट आणि सनग्लासेस परिधान केले आहे. त्याच्या आणखी एका फोटोत त्याचं खास घड्याळ दिसतं आहे. तुम्ही म्हणाल की तिच्या त्या घड्याळात काय खास आहे तर हे घड्याळचे हे एक दुर्मिळ मॉडेल आहे. 

पटेक फिलिप नॉटिलस प्लॅटिनम 5711 असं त्याचं नाव असून, त्यावर हिरव्या रंगाचे 32 baguette-cut एमेराल्ड्सही आहेत.



हे घड्याळ प्लॅटिनम (Platinum) या महागड्या धातूच्या साह्याने तयार करण्यात आलं असून, त्याची केस 40 मिलिमीटरची आहे. घड्याळाची डायल डार्क ग्रे असून, त्यात तास दर्शवण्यासाठीही एमेराल्ड्स (Emeralds) या महागड्या रत्नांचा वापर करण्यात आला आहे. 5711 सीरिजमध्ये काही ऑफ-कॅटलॉग व्हेरिएंट्स असून, ते खास ग्राहकांसाठीच राखीव असतात. डार्क डायलचं घड्याळ हे त्यापैकीच एक. या घड्याळांच्या किमती मॉडेलनुसार बदलतात; मात्र हार्दिकच्या घड्याळाची किमान किंमत पाच कोटी रुपये असेल.

या घड्याळात डेट विंडो 3 वाजताच्या ठिकाणी असून, 45 तासांचा पॉवर रिझर्व्ह आहे. 5711 ही सीरिजच दुर्मीळ आहे. त्यात एमेराल्डने मढवलेली घड्याळं तर आणखी दुर्मीळ आहेत. कॉमेडियन केव्हिन हार्ट, रॅपर ड्रेक यांच्याकडेही अशी घड्याळं आहेत. पंड्याला घड्याळं आवडतात आणि आपली हौस भागवण्यासाठी त्याने हे महागडं दुर्मीळ घड्याळही खरेदी केलं आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top