पारनेर/ प्रतिनिधी: येथील तहसील कार्यालयात पारनेर तालुक्यातील तलाठी लिपिक व महसूल कर्मचारी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रत्येक्षात मात्र तलाठी लिपिक व महसूल कर्मचारी यांच्या काम बंद आंदोलनामुळे विदयार्थी/शेतकरी व सर्वसामान्य जनतेची अडवणूक होत असल्याची भावना शिवबा संघटनेचे अनिल शेटे यांनी व्यक्त केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले की, आंदोलन जरूर करा. काळ्या फिती बांधून निषेध करा. तुम्ही व तुमच्या वरिष्ठांमध्ये जे काहीही वाद असो त्याबद्दल सर्वसामान्य जनतेला काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे तुमच्या या आंदोलनामुळे विदयार्थी/शेतकऱ्यांची व सर्वसामान्य जनतेची अडवणूक होता कामा नये. त्यामुळे तुम्ही त्वरित काम चालु करा.
अडमुठे पणाची भूमिका सोडून तातडीने कामावर रुजु व्हा. हवे तर काळ्या फिती बांधून तुम्हाला जो काही निषेध नोंदवायचा आहे तो नोंदवा मात्र काम करा विदयार्थी, शेतकरी व सर्वसामान्य जनतेची अडवणूक करु नका. असा मनमानी कारभार सर्वसामान्य जनता सहन करणार नाही.- अनिल शेटे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद