महसुलचे कर्मचारी कामबंद आंदोलनात व्यस्त तर तहसीलदार करतात नागरिकांची कामे

0

पारनेर/ प्रतिनिधी: पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी २५ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन करत संप पुकारला असून नागरिकांची कामे खोळबत आहेत. तर दुसरीकडे नागरिकांची कुठलीही कामे अडू नये म्हणून स्वतः तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह नायब तहसीलदार व इतर अधिकारी नागरिकांची कामे मार्गी लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कर्मचारी संपावर असताना स्वतः तहसीलदार कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतून नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत.



तहसीलदार ज्योती देवरे मनमानी व दडपशाही करत असून मनमानी करत असल्याचा आरोप करत महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी, कारकून व इतर असे ४१ कर्मचारी काम बंद आंदोलनात २५ ऑगस्ट पासून सहभागी झालेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांना कुठलीच लेखी कल्पना अथवा तक्रार मिळाली नसल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. कर्मचारी जरी संपावर असले तरी नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नसून मी स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, नायब तहसीलदार माळवे आदींसह इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. महसुलचे कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असून नागरिकांचे कामे अडून राहतील असा गैरसमज नागरिकांच्यात असून तसे काही न होता आम्ही स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही. नागरिकांनी गैरसमज करू नये. कोणाची काही कामे असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे. 


प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादात इतर कर्मचार्‍यांना संप करायला लावणे अतिशय चुकीचे आहे. दडपशाही होत असेल तर प्रशासनात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याची व्यवस्था आहे. परंतु तसे न करता रस्त्यावर उतरने हे सेवा नियमांचे उल्लंघन आहे. सामान्य नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. अश्या तलाठ्यांना तात्काळ निलंबित केले जावे. - 
सचिन भालेकर (अध्यक्ष - पारनेर परिवर्तन)


असा मनमानी कारभार सर्वसामान्य जनता सहन करणार नाही.- अनिल शेटे

 

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top