नारायणगव्हाण शिवारात विचित्र अपघात

0

पारनेर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण शिवारात नगर- पुणे महामार्गावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजक ओलांडून समोरच्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांचा अपघात | अपघातात चार जण जखमी | सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत सचिन बोरुदिया यांनी सुपा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सचिन बोरुदिया हे ईको गाडीने (एमएच १४ ईयू ०७०९) चिंचोली पाटील, अहमदनगर येथे जात असताना पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण शिवारातील नवले मळा येथे समोरून पुण्याच्या दिशेने जात असलेला ट्रक (क्रमांक सीजी ०५ एमएच २९१५ ) या गाडीवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुभाजक ओलांडून आमच्या इको गाडीला जोराची धडक दिली. असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यात गाडी पलटी होऊन गाडीत असलेल्या ललिता माणिकचंद बोरुदिया, पत्नी सुप्रिया सचिन बोरुदिया, मुलगा राज सचिन बोरुदिया व तनिष बोरुदिया हे जखमी झाले. तर त्याचवेळी पुण्याहून नगरच्या दिशेने जात असलेल्या हिंगोली डेपोची बस (क्रमांक एमएच २० बीएल २८५१) या गाडीवरही तो मालट्रक धडकला. अशा तिहेरी विचित्र अपघातात तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा करत अपघात ग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजुला काढून आपघातातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर नादुरस्त वाहने बाजुला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला.
या घटनेचा पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गादर्शनाखाली पोहेकॉ. अकोलकर, कोतकर हे करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top