मुंबईची ही 'वजनदार' डान्सर बदलतेय Belly Dancer ची प्रतिमा, अनेकांनी प्रेरणा घ्यावा असा VIDEO आवर्जून पाहा

0

मुंबई: आपण बेली डान्स बद्दल ऐकलं आणि बेली डान्स पाहिलाही असेल, तुम्ही बेली डान्सर या बारीक, कमनीय बांध्याच्या पाहिल्या असतील त्यामुळे तुमच्या मनात नक्कीच अशी प्रतिमा तयार झाली असणार की बेली डान्स फक्त बारीक व कमनीय बांधा असणार्‍या व्यक्तिच करू शकतात. आणि हो बेली डान्सिंग ही एक कला त्यामुळे वजनदार आणि जाड व्यक्तींनी हा डान्स करायचा नाही. असा काही नियम कुठे लिहून ठेवलेला नाही. अनेक जन जाड असलेल्या व्यक्तींना नाव ठेवत असतात. त्यामुळे Body Shaming चा अनुभव अनेकींना येतोच, त्यातल्या त्यात बेली डान्सरना जास्तच. परंतु मुंबईची डान्सर प्रीती डिसूझा या बेली डान्सरने इतर लोकांकडे लक्ष न देता मनावर येणार दडपण बाजूला झुगारून ती बिनधास्त नाचते आणि आता तर वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्म करून डान्स शिकवतेसुद्धा.

प्रीतीचे वजन जास्त, शरीर कथितअर्थाने कमनीय नाही, ती भरपूर लठ्ठ तरी बेली डान्सिंगसारखा प्रकार चारचौघांसमोर करताना अर्थातच प्रीतीला अवघड गेलं. 



डान्स ही माझी पॅशन होती, पण पॅशन आयुष्यासाठी पुरेसं नाही. घरच्यांनासुद्धा सुरुवातीला प्रीतीचं हे नाचणं पसंत नव्हतं. "आईसुद्धा म्हणायची, आधी वजन कमी कर मग नाच. खूप विचित्र दिसतं असं नाचणं वगैरे...'- प्रीती डिसूझा

अगदी डिप्रेशन येईपर्यंत प्रीतीला टोमणे ऐकावे लागले होते. पण त्यातून ती बाहेर पडली. आज प्रीती डिसूझा बिनधास्त स्वतःचे VIDEO सोशल मीडियावर शेअर करते. तिचं कौतुक होतं. ती दुसऱ्यांना हा नृत्यप्रकारही शिकवतेसुद्धा.


प्रीतीचे VIDEO पाहिले तर तिच्यातल्या नृत्यकौशल्याला निश्चितच दाद द्यावी वाटते. त्याहीपेक्षा जास्त दाद तिच्यातल्या धैर्याला, सकारात्मकतेला आणि बेधडक वृत्तीला सलाम करावा वाटतो. खरं तर अनेकांनी प्रीतीकडून प्रेरणा घ्यावी व आपल्या कालगुणांना वाव द्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top