नितीन गडकरींच्या ताफ्यातील वाहनाला अपघात.

0

नागपुर: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झालाय, सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना नाही. मात्र ताफ्यातील वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपुरमधील छत्रपती चौकात गडकरी यांच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकल्याने हा अपघात झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अपघाताची पाहणी केली. त्यानंतर ते निवासस्थानाकडे रवाना झाले. ही घटना शनिवारी रात्री छत्रपती चौकात घडली. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. असे तेथील पोलिस आधिकाऱ्याने सांगितले. 


मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोनगाव येथील कार्यक्रम संपवून घराकडे परतत होते. त्यावेळीच छत्रपती चौकात सिग्नल लाल झाल्यानंतर ट्रकचालकाने जोरात ब्रेक दाबल्याने गडकरींच्या ताफ्यातील पहिल्या क्रमांकावर असलेली एमएच-०१-सीपी-२४३५ या क्रमांकाचे वाहन ट्रकवर आदळले. यामध्ये वाहनाचे नुकसान झाले आहे. वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला


असून सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही.


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top