पारनेर/ प्रतिनिधी: येथील तहसील कार्यालयात पारनेर तालुक्यातील तलाठी लिपिक व महसूल कर्मचारी यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे . तहसीलदार ज्योती देवरे यांना विचारणा केली असता त्यांनी या आंदोलनाची कोणतीही रीतसर नोटीस किंवा माहिती आपल्याला दिली गेली नाही. तसेच गेले दोन वर्ष आपण या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन सचोटीने काम करत आहोत मात्र अचानक या महसूल कर्मचारी व तलाठी यांना काय झाले की, ते काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. तसेच यांच्या काम बंद आंदोलनामुळे ज्या शेतकऱ्यांना रस्ता केस तारखा दिल्या आहेत ते सर्व शेतकरी पारनेर तहसील कार्यालयात येऊन बसले आहेत या कारणाने ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची पिळवणूक या आंदोलनामुळे होत आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला किंवा ग्रामस्थांना महसूल विभागाकडून कुठलीही अडचण असेल तर मला संपर्क करा असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. तर या आंदोलनाच्या वेळी तलाठी वर्षा पवार, घोडके, गोरे डी डी, विराज वाघमारे, गावडे भाऊसाहेब वसेकर, गोरे एस एस, मगर, रोकडे, मांडे, जगदाळे, गोरे तसेच तालुक्यातील सर्व तलाठी कर्मचारी या आंदोलनास उपस्थित होते.
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी लिपिक व महसूल कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू
ऑगस्ट २५, २०२१
0
Tags
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद