पारनेर तालुक्यातील जलसंधारण कामांचा निधी हा माजी आमदार विजय औटी व सभापती काशिनाथ दाते सर व सर्व शिवसैनिकांच्याच पाठपुराव्याने दिला :- नामदार शंकरराव गडाख

0

पारनेर/प्रतिनिधी:  तालुक्यातील जलसंधारण कामांसाठी दिलेला २७ कोटी रुपयांचा निधी हा माजी आमदार विजय औटी, जिल्हा परिषद कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते सर व सर्व शिवसैनिकांच्या पाठपुराव्याने दिला असल्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील निघोज पठारवाडी येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या नवीन इमारत उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी माजी आमदार विजय औटी, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सभापती काशिनाथ दाते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, विकास(बंडूशेठ)रोहोकले शिवसेना तालुका प्रमुख, सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती डॉ.श्रीकांत पठारे उपस्थित होते.




हे सरकार शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आशा मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या अंतर्गत हा निधी दिला असून, अहमदनगर जिल्ह्याचा भूमिपुत्र या नात्याने सगळ्यात जास्त निधी आपल्या जिल्ह्यात व जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात दिला आहे. यासाठी माजी आमदार विजय औटी, सभापती काशिनाथ दाते सर व सर्वच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या सर्वांच्या मागणीनुसार व पाठपुराव्यानेच हा निधी उपलब्ध करून दिला आहे.- नामदार गडाख

तसेच राज्यात इतरही ठिकाणी अगदी शिवकालीन बंधारे, इंग्रज सरकारच्या काळात झालेले बंधारे यांचाही समावेश असून जास्तीत जास्त पाझर तलाव व इतरही बंधारे यांच्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे नामदार गडाख यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

यावेळी पठारवाडी सरपंच उर्मिला सुपेकर, चेअरमन सुखदेव पठारे, संतोष सुपेकर, पिराजी पवार, बाबाजी तनपुरे, भास्कर सुपेकर, कुंडलिक पठारे, शंकर पठारे, उपसरपंच जयसिंग पवार, शाखाप्रमुख बबन पवार मारुती सुपेकर, बारकू सुपेकर, मोहन पवार, मोहन सुपेकर, गणेश पवार, गजानन सोमवंशी, विठोबा पवार, लहू बोदगे, निसार मोमीन, मारुती पठारे, जनार्दन पवार, दगडू सुपेकर, भाऊ पवार, भरत पवार, लक्ष्मण सुपेकर, आबा सुपेकर, संतोष सुपेकर, संदीप सुपेकर, पांडुरंग सुपेकर, बबन ससाने, दत्ता कवाद, जवळा गावचे मंगेश सालके, बबनराव सालके, गोरख पाटील, गजानन सोमवंशी, डॉक्टर सोमेश्वर आढाव, सुभाष रासकर, सतीश रासकर, शिरीष शेलार, अशोक सालके, प्रदीप पठारे, जिल्हा बँकेचे इंद्रभान शेळके, कार्यकारी अधीक्षक प्रभाकर लाळगे, रंगनाथ गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिराजी पवार यांनी केले तर आभार किसनराव सुपेकर यांनी मानले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top