कोरठन यात्रा महोत्सव कोरोना मुळे शुकशुकाट

0

पारनेर/प्रतिनिधी (निलेश जाधव): तालुक्यातील प्रति जेजुरी म्हणून महाराष्ट्र भर प्रसिद्ध असणाऱ्या श्री. क्षेत्र कोरठन खंडोबा देवस्थानच्या पौष महिन्याच्या तीन दिवशीय यात्रा महोत्सवास सुरवात झाली असून सोमवार दिनांक १७ जानेवारी या दिवशी सकाळी अहमदनगर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित पत्नी सौशीतल निचित यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता अभिषेक व महापूजा आरती मंगलमय वातावरणात करण्यात आली. यावेळी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष अँड पांडुरंग गायकवाड, विश्वस्त अभय गुंजाळ, बन्सी ढोमे, सुरक्षा अधिकारी सुरेश सुपेकर, मंडळ अधिकारी पंकज जगदाळे, तलाठी फतले, श्री उंडे, संतोष मांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. तर यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. संदीप निचित यांनी श्री. खंडोबा हे सर्व सामन्यांचे कुलदैवत कायमच श्रद्धास्थानी राहिले आहे. आपल्या जन्मदिवसाच्या दिनालाच यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक महापूजा व आरतीचा सपत्नीक लाभ प्रथमच लाभल्याने समाधान वाटते आहे. यात्रा उत्सव कोरोनामुळे रद्द असून त्यानुसार झालेले नियोजनाबाबतही त्यांनी देवस्थान मध्ये माहिती घेतली. मंदिर परिसराच्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले.




दर वर्षी होणारी कोरठन यात्रा महोत्सव यावर्षी ही कोरोना नियमामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थिती मध्ये होणार आहे. दर वर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र काठ्यांचे मानकरी व त्यांच्या सोबत १० भाविकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. या येणाऱ्या काठ्यांचे मानकरी याची आर टी पी सि आर चाचणी आवश्यक असणार असल्याची शासकीय अधिकारी यांनी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top