VIDEO: शिक्रापूर येथील भीषण अपघातचा विडिओ असा घडला अपघात

0

पुणे : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर जवळ रविवारी २४ वा मैलनजीक ट्रक ने कार आणि दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत पाच जण ठार झाल्याची घटना घडली होती. या अपघाताचे  सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा भीषण अपघात नेमका कसा घडला यातून दिसत आहे.

अपघातातील एका जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. विठ्ठल हिंगाडे रेश्मा विठ्ठल हिंगाडे (राहणार पारनेर) लीना निकसे ( दांडेकर पूल पुणे) व अन्य दोन जण (नावे समजू शकली नाहीत) यांचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे- नगर महामार्गावर रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नगरच्या दिशेने ट्रक निघाला होता.

त्यावेळी दुसऱ्या लेन वरून एक कार आणि दोन दुचाकी पुणे व बाजूकडे जात असताना शिक्रापूर येथील २४ वा मैलनजीक अचानक पणे ट्रक दुभाजकावरुन दुसऱ्या लेन वर गेला आणि समोरून येणाऱ्या दोन दुचाकी आणि कारला जोराची धडक दिली होती. यामध्ये दुचाकीवरील हिंगाडे दाम्पत्य व कारमधील लिना निकसे तसेच अन्य एक जणांचा मृत्यू झाला. दरम्यान दोन जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत एका जखमीचा मृत्यू झाला होता. अन्य दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top