नाशिक: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे नाशिक जिल्ह्यात दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले आहेत. या दौऱ्या दरम्यान राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराची विधीवत पुजा केली. तसेच कुशावर्त येथे देखील पुजा करून दर्शन घेतले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पंकज भुतडा, संतोष कदम, भूषण अडसर उपस्थित होते. यावेळी पूजा प्रशांत गायधनी, पराग धारणे यांनी सांगितली.
नाशिक गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाले. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.
शासकीय विश्रामगृहात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आगमन झाल्यावर त्यांना शहर पोलीस दलाच्यावतीने सलामी देण्यात आली.
Welcome to Governor Bhagat Singh Koshyari at Government Rest House;
After resting, he left for Mumbai |
राज्यपाल यांचे मुंबईकडे प्रयाण
यानंतर नाशिक शासकीय विश्रामगृह येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अल्प विश्रांतीनंतर मुंबईकडे प्रयाण केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद