शासकीय नियमानुसार काठ्या पालख्यांना परवानगी : प्रांताधिकारी सुधाकर भोसले

महाराष्ट्र दर्शन NEWS
0

पिंपळगाव रोठा/प्रतिनिधी : पारनेर येथील भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कोरठण खंडोबा देवस्थानच्या दि.१७ ते १९ जानेवारीदरम्यानच्या यात्रेनिमित्ताने  मानाच्या काठ्या व पालख्यांना परंपरेनुसार देवदर्शन घेण्यासाठी काठ्या व पालख्यांसोबतच्या मोजक्याच भाविकांना कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियम पाळून परवानगी मिळेल- प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, सरपंच सुरेखा वाळुंज, उपसरपंच महादेव पुंडे, विश्वस्त अमर गुंजाळ, चंद्रभान ठुबे, किसन मुंढे, बन्सी ढोमे, देवीदास क्षीरसागर, दिलीप घोडके, रामदास मुळे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, अच्युतराव जगदाळे, डाॅ.प्रतिक शिंदे, डॉ. नवनाथ शेलार, मंडलाधिकारी पंकज जगदाळे मानकरी सुरेश गायकर, शांताराम गाडगे, साहेबराव वाफारे, सुरेश शिंदे, एकनाथ गाडगे, राजेंद्र मटाले, निवृत्ती भुजबळ आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी यांनी यावेळी सांगितले मानाच्या काठ्या पालखी सोबतच्या भाविकांचे ४८ तासापुर्वीची आर टी पी सी आर चाचणी तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले बंधनकारक राहणार असून कोरोनाबाबत सर्व प्रकारची काळजी घेऊन परंपरेप्रमाणे कमीत कमी लोकांमध्ये यात्रेचे धार्मिक कार्यक्रम केले जातील मागील वर्षीप्रमाणेच मानाच्या काठ्यांची उंची तेवढीच राहणार असल्याचे प्रांताधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. तसेच देवस्थान जवळ कोणतीही मानाची काठी व पालखी मुक्कामी राहणार नाही असे भोसले यांनी सांगितले. पो.निरीक्षक घनश्याम बळप यांनी एका काठी पालखीसोबत प्रत्येकी दहा भाविकांना परवानगी मिळणार असून त्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे पारनेर पोलीस ठाण्यात सादर केल्यानंतर त्यांना पास दिले जातील. देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा यांनाही नियमानुसार पास घ्यावा लागेल तसेच वाहनासंबंधीही नियमानुसार कागदपत्रे सादर केल्यानंतर काठ्या पालखीच्या वाहनांना पास दिला जाईल बिगर पासचे कोणतेही वाहन अथवा भाविकाला देवस्थानजवळ सोडले जाणार नाही असे बळप यांनी स्पष्ट करून दि १४ व १५ जानेवारी रोजी पारनेर पोलीस ठाण्यात यासंबंधीची प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल असे सांगितले. यात्राकाळात भाविकांसाठी दर्शन व्यवस्था बंद राहील असे प्रशासन व देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top