पारनेर/महाराष्ट्र दर्शन News- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई या ठिकाणी जाऊन पारनेर तालुका शिवसेना प्रमुख विकास (बंडूशेठ) रोहोकले व अहमदनगर चे नगरसेवक अनिल शिंदे, भिंगारचे उपनगराध्यक्ष प्रकाश फुलारी, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, उद्योजक श्रीनिवास जवर यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी पारनेर तालुका विकास यावर एकनाथ शिंदे साहेब या समवेत चर्चा केली त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत पारनेर तालुक्यात बंधारे, जलसाठे, रस्ते व इतर कामे करून पारनेर तालुक्याच्या विकासात भर घालण्याचे काम आपण मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करू येणाऱ्या काळात पारनेर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोलाची साथ द्यावी असे विकास (बंडूशेठ) रोहोकले यांनी बोलताना सांगितले.
पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर चर्चा केली असल्याचे विकास (बंडूशेठ) रोहोकले यांनी सांगितले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद