निघोज | महाराष्ट्र दर्शन News
मळगंगा देवीचा महिमा अगाध आहे. राज्यातील भाविकांना मातेचा आशिर्वाद आहे. म्हणून आपले राज्य समृद्ध असल्याचे प्रतिपादन देवगड येथील दत्त देवस्थानचे हभप भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या कलशारोहण कार्यक्रम मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी आयोजित किर्तनात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील उपस्थित होेते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते भास्करगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला.
देवदेवालय म्हणजे संस्कारमय मंदिरे आहेत. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यादव बाबांच्या आशीर्वादाने आज जगात सामाजिक कामांच्या माध्यमातून समाजाभिमुख काम केले आहे. देवदेवतांचा आशिर्वाद समाजाला मिळण्याची आज नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आ.नीलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात सेवाभावी कार्य केले. सेवाभाव असो सामाजिक काम असो किंवा धार्मिकता यातून आशिर्वाद मिळतो म्हणून आज देवदेवतांचे आशिर्वाद आणी संस्कारक्षम समाजाची आज खर्या अर्थाने गरज आहे.- भास्करगिरी महाराज
मळगंगा देवीने प्रेरणा दिली आशिर्वाद दिला समृद्धी दिली म्हणून आपण हा कार्यक्रम एकात्मने करीत आहोत. कलशारोहन झाल्यानंतर आपण उपासनेचे खर्या अर्थाने अधिकारी झालो आहोत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगात आईची शितलता, माया आणी आशिर्वाद याची महती सांगितली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रपंचातील काहीच उपयोगात येत नाही. मात्र परमार्थात सर्वच उपयोगात येत आहे. भरकटत चाललेल्या समाजाला मंदिरेच तारु शकतील असा आमचा विश्वास आहे. सामाजिक बदल केवळ मंदीरातून होतो. मंदिरातून मला ज्ञान मिळाले आणि २५ व्या वर्षी मला खर्या अर्थाने जीवन कळाले असल्याचे त्यांनी सांगितले.- जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद