बिबट्यासाठी तातडीने पिंजरा लावावा शिवबा संघटनेची मागणी

0

निघोज/ महाराष्ट्र दर्शन News : पारनेर तालुक्यातील निघोज गावातील लामखडे वस्ती, वरखडे वस्ती, शिवडी, दर्याचा मळा व आजूबाजूच्या परीसरात बिबट्या निदर्शनास येत आहे. बिबट्याने अनेक कुत्र्याची शिकार केली आहे. एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. म्हणूनच हा बिबट्या तातडीने जेरबंद करण्यात यावा यासाठी पारनेर वनविभाग कार्यालयाला निवेदन देण्यात आले. शिवबा संघटनेने पिंजरा न लावल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या निवेदनावर शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, शंकर पाटील वरखडे, अमोल भाऊ ठुबे, संतोष लामखडे, नवनाथ लाळगे, निघोज शहर प्रमुख अंकुश वरखडे, निलेश वरखडे, अविनाश लामखडे, विशाल लामखडे, नानाभाऊ लामखडे, संतोष लामखडे, निलेश लामखडे, मच्छिंद्रनाथ लामखडे, नवनाथ लामखडे आदी शिवबा संघटना सहकार्यांच्या सह्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top