निघोज | महाराष्ट्र दर्शन News
पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र येथील मळगंगा देवी मंदिराचा कलशरोहन सोहळा संपन्न होणार असून या कलशाची आज सोमवार दिनांक ७ रोजी सकाळी ९ वाजता वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये वांबोरी येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हे कलशरोहन देवगड येथील श्री. दत्त देवस्थानचे महंत ह.भ.प भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद व उपकार्याध्यक्ष शांताराम लंके यांनी दिली.
कलशारोहण कार्यक्रमानिमित्त कुंड पर्यटन क्षेत्र येथील मळगंगा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कलश पुजन व अभिषेक कार्यक्रम आळंदी येथील वेदांतचार्य ह.भ.प.नारायण महाराज जाधव, नंदकुमार महाराज वराळ, ठाणे येथील राजू महाराज सारंग, पोपट महाराज देशपांडे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
दूपारी ३ ते ५ यावेळेत ढोबळेवाडी येथील वडजादेवी भजनी मंडळाच्या संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.८) सकाळी ९ वाजता भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता भास्करगिरी महाराज यांचे किर्तन होणार असून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दूपारी ३ वाजता निघोज व परिसरातील भजनी मंडळाच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.jpg)
.gif)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद