कुंड पर्यटन क्षेत्र येथे नवकुंडात्मक नवचंडी याग महायज्ञ सोहळ्यास सुरुवात / ज्यांना या महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच मळगंगा मंदीरात नोंदवावी- ज्ञानदेव नामदेव लंके मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष यांचे आवाहन

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र परिसरातील मळगंगा देवी मंदिर याठिकाणी नवकुंडात्मक नवचंडी याग महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम बुधवार दि.8 जुन ते मंगळवार दि.14 जुन या कालावधीत संपन्न होणार आहे.

ज्यांना या महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच मळगंगा मंदीरात नोंदवावी- ज्ञानदेव नामदेव लंके (मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष)

हा नवकुंडात्मक नवचंडी महायज्ञ सोहळा बुधवार दि.8 जुन ते मंगळवार दि.14 जुन (वटपौर्णिमा) दरम्यान आचार्य विवेक पारेकर ( डोंबिवली ) यांच्या पौराहित्याखाली व हे.भ.प. राजेश दादा सारंग व ह.भ.प.पोपटकाका देशपांडे यांच्या सहकार्‍याने कोरोनाचे नियम पाळून संपन्न होणार आहे. ज्या भावीक भक्तांना या मध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व मळगंगा मंदीरात नाव नोंदणी करण्याचे आवाहन ज्ञानदेव लंके यांनी केले आहे. प्रत्येक दिवशी अभिषेक, वस्त्र, अर्चन, होमहवन, जागर, महाआरती, महाप्रसाद कार्यक्रम संपन्न होणार आहेत. प्रत्येक दिवशी उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.14 रोजी रात्री 8 ते 12 पर्यंत प्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे व आमलेशभाऊ जावळकर यांचा देवी व खंडोबाच्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top