महाराष्ट्र दर्शन न्युज / शिरूर,पुणे / सागर आतकर मुख्यसंपादक
शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील सौ. शिवानी राहुल रायकर या बी. एस्सी. (शास्त्र शाखा पदवीधर) या तरुणीने वाढदिवसासाठी लागणारे केक बनविण्याचे प्रशिक्षण घेत स्वतः उत्तम, आकर्षक केक बनवून ते विक्री करण्याच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. शिवणी या पदवीधर आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात न राहता स्वकौशल्यावर व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरवले. त्यांनी आज ४ जून रोजी केकशॉपचा शुभारंभ करत इतर तरुणी व महिलांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी ठरल्या आहेत. अखंड मेहनत, जिद्द व चिकाटी असेल तर ग्रामीण भागातील तरुणी, महिला ही व्यवसायातून कौटुंबिक आर्थिक हातभार लावून आपली प्रगती साधू शकतात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवानी रायकर यांच्यात पाहावयास मिळते.
शिवानी रायकर यांचे पती राहुल रायकर यांनी शिवानी यांच्यात असलेली जिद्द, चिकाटी लक्ष्यात घेऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन कौटुंबिक आर्थिक हातभार लावण्याची असलेली तीव्र इच्छा लक्षात घेत शिवानी यांना केक बनविण्याचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शिवानी यांनीही पती राहुल यांचा विश्वास सार्थ ठरवत केक बनविण्याचे उत्कृष्ट प्रशिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला ऑर्डर प्रमाणे घरी केक बनवून देण्याचे काम सुरु झाले. पाहता पाहता शिवानी यांनी तयार केलेल्या स्वादिष्ट केकला मागणी वाढू लागली. यातून त्यांना आणखी प्रेरणा मिळाली. ग्राहकांना जलद केक उपलब्ध व्हावेत व तत्पर सेवा मिळावी या उद्देशाने शिवानी यांनी कवठे येमाईच्या मळगंगा मंदिरासमोरील आपल्या घरालगतच दहा बाय दहाच्या जागेत आकर्षक असे श्रेयश केक शॉप नावाचे नवीन दुकान सुरु करीत व्यावसायिक पदार्पण केले आहे. त्यांना महाराष्ट्र दर्शन न्युज च्या वतीने भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद