१५ दिवसांत सुधारणा व निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन करणार - अनिल शेटे

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी -सागर आतकर

निघोज आरोग्यकेंद्र हे निघोज, देविभोयरे, पठारवाडी, देविभोयरे, गुणोरे व आजुबाजुच्या गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय उपचाराचे महत्वाचे ठिकाण आहे. लोकसंख्या मोठी असल्याने याठिकाणी शासनाने दोन डॉक्टर उपलब्ध केलेले आहे. दिवसा व रात्री मात्र रात्रीचे डॉक्टर फक्त कागदावर उपलब्ध असल्याने याठिकाणी रात्री अपरात्री अनेक ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. काही पेशेंट मागील काळात दगावलेही आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही सुधारणा नाही. यावेळी ग्रामस्थांची सर्वात प्रमुख मागणी हिच आहे कि, रात्री याठिकाणी डॉक्टर उपलब्ध असायलाच हवा.

याठिकाणी अनेक जागा रिक्त आहेत त्याबाबत हि अनेक वेळा शिवबा संघटनेने पाठपुरावा केला आहे. ती पदेही तातडीने भरली पाहिजे. याठिकाणी डॉक्टर ची भरती झाली मात्र डॉक्टर जर फक्त कागदावरच असणार असेल तर जनतेला काय फायदा ? मात्र हे यापुढील काळात सहन केले जाणार नाही. शिवबा संघटना व ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. १५ दिवसांत सुधारणा व  निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन करणार - अनिल शेटे 

यासंदर्भात निवेदन सबंधित अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी अनिल शेटे, शांताराम पाडळे, निलेश दरेकर, मनोहर राऊत, राजु भाऊ लाळगे, शंकर पाटील वरखडे, निलेश वरखडे, स्वप्नील लामखडे, संदीप कवाद, मच्छिंद्र लाळगे, पोपट वरखडे, बाबाजी शेटे, शैलेश ढवळे, जगन मगर, बाबाजी लामखडे, अंकुश वरखडे, राहुल शेटे, अविनाश लामखडे, स्वप्नील वरखडे, जयराम सरडे, दिनेश गायकवाड, शरद बोराडे, मोहन पवार, मोहन पठारे, किरण सुपेकर, गणेश चौधरी, संतोष येवले, संदीप येवले आदि सहकार्यांच्या सह्या निवेदनावर आहेत.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top