‘गॉडफादर’ या साऊथ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात सलमान खान (Salman Khan)
चिरंजीवी यांच्यासोबत(Cheeranjivi) सोबत दिसणार आहे.
या चित्रपटातून सलमान खान साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करत आहे. याच कारणामुळे ‘गॉडफादर’साठी चाहते खूप उत्सुक आहेत. ‘गॉडफादर’मध्ये चिरंजीवी आणि सलमान खानचा डान्स आहे, ज्याची झलक आता समोर आली आहे. चिरंजीवीने सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहे. काय आहे ही संपूर्ण बातमी चला जाणून घेऊ.
Shaking a leg with The Bhai @BeingSalmanKhan for #GodFather @PDdancing is at his Choreographing Best!! A sure shot Eye Feast!!@jayam_mohanraja @AlwaysRamcharan@MusicThaman @SuperGoodFilms_@KonidelaPro #Nayanthara @ProducerNVP @saregamasouth pic.twitter.com/mRjXRNhaJB
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) July 29, 2022
अभिनेता सलमान खानच्या गॉडफादर चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. चित्रपटात चिरंजीवी आणि सलमानचा डान्स पाहायला मिळणार आहे. ज्याचे फोटो दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांनी शेअर केले आहेत. चिरंजीवी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते सलमान खानसोबत दिसत आहे पण दोन्ही कलाकारांचे चेहरे दिसत नाहीत. फोटोमध्ये दोघांची पाठ दिसत आहे आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक बॅकग्राउंड डान्सर्स आहेत.
सलमान आणि चिरंजीवी यांचे हे गाणे खूपच रॉकिंग असणार आहे हे या फोटोवरुन समजू शकते. कारण या फोटोत दोघेही सूट-बूटमध्ये सज्जन दिसत आहेत आणि दोघांचा एक पाय हवेत आहे. म्हणजेच हा फोटो शूटदरम्यान काढण्यात आला आहे. प्रभूदेवा हे गाणे कोरिओग्राफ करत आहेत. चिरंजीवी यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट मेगास्टार चिरंजीवीचा १५३ वा चित्रपट आहे.
मोहन राजा ‘गॉडफादर’चे दिग्दर्शन करत आहेत. हा मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक आहे. ‘ल्युसिफर’ चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनही दिसले होते. असा दावा केला जात आहे की, ‘गॉडफादर’ या चित्रपटात सलमान खानही हीच भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि चिरंजीवीशिवाय नयनतारा, सत्यदेव कांचन आणि जय प्रकाश दिसणार आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद