रांधे येथील श्री. क्षेत्र विठ्ठलवाडी येथे देवषयनी आषाढी एकादशी सोहळा यावर्षी होणार उत्साहात साजरा

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर- रांधे / सागर आतकर

पारनेर तालुक्यातील रांधे येथील श्री. क्षेत्र विठ्ठलवाडी येथील संत श्री.बाळोबा महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन जिथे स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी प्रकट झाली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी, तमाम वारकरी विठ्ठलभक्तांची प्रतिपंढरी म्हणून ओळखले जाणारे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी देवस्थान, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्थ विठ्ठलवाडीकर रांधे यांच्या संयुक्त विद्यमाने देवषयनी आषाढी एकादशी उत्सव सोहळा वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या सहभागासोबत पांडुरंगाच्या कृपेने, बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने रविवार दि, १० जुलै २०२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केले आहे तरी आपण सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्तीत राहून विठ्ठलभक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी देवस्थान व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

कार्यक्रमाची रूपरेषा

१) पहाटे ४:३० अभिषेक आणि महापूजा, काकडआरती

अभिषेक मानकरी - श्री भिमाजी हरिभाऊ गाडगे (कळस)

२) सकाळी ८:०० ते १२:०० - विठ्ठलवाडी ते रांधे ते विठ्ठलवाडी पायी दिंडी सोहळा.

३) दु. १ ते ३ - ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसन नगर ठाणे यांचे सुश्राव्य भजन आणि गावोगावाहून येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत .

४) संध्या.५ ते ७ हरिपाठ

५) ७ ते ९- ह भ प. पूनमताई अजय जाचक महाराज (पिंपरी, पुणे - अध्यक्षा महाराष्ट्र संप्रदायिक विभाग. एम फिल. संत तुकाराम हिंदी अभंग. पी.एच.डी- गोस्वामी तुलसीदास आणि संत नामदेव)  यांचे हरी कीर्तन.

६) रात्री ९ वा. एकादशी भोजन फराळ.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top