पारनेर तालुक्यातील पळशी येथे भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भव्य सोहळा होत असतो. जिल्ह्यातून तसेच राज्यातून, तसेच तालुक्याच्या विविध भागातून अनेक विठ्ठल भक्त या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी या तीर्थक्षेत्री येत असतात. पळशी या तीर्थक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. रविवार दि १० जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पहाटे दोन वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर विविध अध्यात्मिक धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील सहपत्नीक यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी स्नान, अभिषेक व आरती असा महापूजेचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दिवसभर तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा दरवर्षीप्रमाणे संपन्न होणार आहे. सकाळी आरती व पूजा संपन्न झाल्यानंतर सकाळी सात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहा व खिचडीचे आयोजन करण्यात आले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद