महाराष्ट्र दर्शन न्यूज / पुणे -दौंड
दौंड येथे राष्ट्रीय हरित सेने तर्फे वही बांधणी कार्यशाळेत तयार झालेल्या वह्याचे व इतर शालेय साहित्याचे वाटप शेठ जोतीप्रसाद विद्यालय दौंड प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना जलदूत राज देशमुख, भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, चेअरमन विक्रम कटारिया, स्व.के.जी.कटारिया महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष समुद्रे, प्राचार्य खाडे एस.जी, उपप्राचार्य देवकर एस. बी. आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
थोर व्यक्तींची चरित्र व आदर्श कायम स्मरणात ठेवून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व घडवावे असे प्रतिपादन जलदूत व नदीजोड प्रकल्पाचे माजी सदस्य राज देशमुख यांनी शेठ जोतीप्रसाद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्य वाटप प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जलदूत राज देशमुख यांचा परिचय उपशिक्षिका माधुरी काकडे यांनी त्यांच्या मधु सिंधू या काव्यप्रकारातून करून दिला.
प्रशालेतील ५वी ते १०वीच्या प्रतिनिधीक ५२ विद्यार्थ्यांना वह्या, २४ विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स, ६ विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे या उपक्रमाचे १४ वे वर्ष होते. याप्रसंगी कागद वाचवा प्रकल्प अंतर्गत वही बांधणी कार्यशाळेत सहभागी झालेल्या राष्ट्रीय हरित सेनेच्या २५ विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक शिवाजी रसाळ, विशाल ओव्हाळ, सोमनाथ चव्हाण, श्रीकृष्ण भुजबळ, वैभव पाटील, श्रीकृष्ण ननवरे, उमेश पलंगे व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आभार प्रदर्शन राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद