रांधे येथील श्री. क्षेत्र विठ्ठलवाडी येथे देवषयनी आषाढी एकादशी सोहळा उत्साहात

0

पारनेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडी मध्ये स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान तर्फे मोठया उत्साहात एकादशी सोहळा साजरा करण्यात आला..

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल डोंगराच्या पायथ्याशी असलेले विठ्ठलवाडी येथील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिर.

 


पांडुरंगाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या संत श्री. बाळोबा महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी जिथे प्रकट झाली ती प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी, तमाम वारकरी विठ्ठलभक्तांची प्रतिपंढरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे सर्व वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या सहभागासोबत पांडुरंगाच्या कृपेने बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने, याही वर्षी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्थ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. त्या सोहळ्याची सुरुवात पहाटे मुर्तीस अभिषेक, महापूजा आणि काकड आरतीने झाली.  या वर्षीचा अभिषेकाचा मान कळस येथील श्री भिमाजी हरिभाऊ गाडगे यांना मिळाला. तसेच दिवसभरात सकाळी विठ्ठलवाडी ते रांधे तसेच पुन्हा रांधे ते विठ्ठलवाडी असा पायी दिंडी सोहळा पार पडला. यावेळी निसर्गरम्य आणि डोंगराच्या सानिध्यातील हिरव्यागार वातावरणात तल्लीन होतं हजारो वारकऱ्यांनी पांडुरंगाच दर्शन घेतल.

 


दु. १ ते ३ यावेळेत ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसन नगर ठाणे यांचे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला. दरम्यान येणाऱ्या दिंड्यांचही स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून स्वागत सोहळाही पार पडला.

संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत आळंदी येथील विद्यार्थी वृंद यांचा हरीपाठ कार्यक्रम पार पडला.

रात्री ७ ते ९ यावेळी  ह भ प. पूनमताई अजय जाचक महाराज यांचे हरी कीर्तन सोहळा संपन्न झाला.

रात्री ९ वा. एकादशीचा फराळ करत कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी आलेल्या सर्व भाविकांचे आभार स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top