टाकळी ढोकेश्वर येथे आरोग्य आहार प्रात्यक्षिक परीक्षा दिन साजरा

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी : सागर आतकर

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये आरोग्य आहार प्रात्यक्षिक परीक्षा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.सौ. स्वाती खिलारी या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी हे होते. 

आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाने आपली प्रगती केली आहे. हे जरी खरे असले तरी त्याच झपाट्याने विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. अयोग्य आहार, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यामुळे आजारांना जणू काही एक प्रकारचे आमंत्रण देत आहेत असे प्रतिपादन डॉ.सौ. स्वाती खिलारी यांनी केले.

गर्भवती महिलांनी आपल्या रोजच्या आहारात दिवसातून एकवेळ सकस आहार घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सदृढ बालक जन्माला येईल. त्याचप्रमाणे विविध आजारग्रस्त रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार योग्य आहार देण्याची गरज आहे. - डॉ.सौ. स्वाती खिलारी

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये आरोग्य आहार प्रात्यक्षिक परीक्षा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.सौ. स्वाती खिलारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

आजारपणामुळे रूग्णांची मानसिकता बदलेली असते. त्यामुळे रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर व नातेवाईकांनी त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.- डॉ. भाऊसाहेब खिलारी

यावेळी सावली प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी, डॉ. सौ स्वाती खिलारी, यांच्यासह डॉ मिरा पुरी, डॉ निमसे मॅडम, प्राचार्य सुशांत शिंदे, श्वेता शिंदे, प्रा. नामदेव वाळुंज, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजन व नियोजन प्रा. आयशा शेख, प्रा. योगिता अडसूळ यांनी केले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top