![]() |
शुभारंभ प्रसंगी वेद करताना वाघोलीच्या सरपंच वसुंधरा ताई शिवदास उबाळे तिळवंण तेली समाज सुदबुरे संताजी महाराज जगनाडे संस्थान अध्यक्ष शिवदास मनोहर उबाळे व मान्यवर |
महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील जवळे येथील शेलार कुटुंबियांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या शालेय उपयोगी वह्या च्या उत्पन्नाच्या व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज देवस्थानचे अध्यक्ष शिवदास मनोहर उबाळे हे उपस्थित होते. यावेळी वाघोली चे सरपंच वसुंधरा ताई शिवदास उबाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यशस्वी उद्योजक होण्यासाठी पारदर्शकता कष्ट करण्याची तयारी जिद्द, चिकाटी व प्रामाणिकपणा तसेच दूरदृष्टी ठेवून आपण आपल्या व्यवसायातून ग्राहकाला चांगले वक्ष दर्जादार आपले उत्पादन कसे देऊ तोच व्यावसायिक भविष्यात मोठा उद्योजक होऊ शकतो.- शिवदास मनोहर उबाळे (श्री. संत जगनाडे महाराज देवस्थानचे अध्यक्ष)
जवळे तालुका पारनेर उपसरपंच गोरख शिवाजी पठारे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुषमा गोरख पठारे, संदीप शिवाजीराव सालके, दिलीप सदाशिव शेलार, कैलास गोविंद शेलार, बबन मधुकर शेलार, प्रवीण राऊत, विजय फल्ले, गणेश रत्नपारखी, भाऊसाहेब किसन शेलार, मदन शेठ कृष्णाजी रत्नपारखी, विनायक मारुती शेलार, मेजर गोरख सालके, अनिल पिसाळ, प्रमोद जाधव, किरण खळदे, सुधीर शंकरराव रत्नपारखी, सुनील दत्तात्रेय रत्नपारखी आदी उपस्थित होते.
शिवदास उबाळे म्हटले की जवळे येथील शेलार कुटुंबातील रवींद्र शरद शेलार व पत्नी साधना रवींद्र शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेला व्यवसाय हा समाजाला प्रेरणा देणारा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलाना उद्योगांसाठी विविध शासनाच्या योजना जाहीर केलेले आहेत. जेणेकरून प्रत्येक समाजातील कुटुंब हे सक्षम होईल शेलार यांच्या मातोश्री यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर वडिलांची कोणतीही जाणीव या तीन मुलांना भासू न देता मुलांना स्वतः कष्ट करून स्वबळावरती उभे राहण्याचे शिकवले म्हणूनच रवींद्र शेलार व साधना शेलार हे हा व्यवसाय आज सुरू करू शकले आहेत. असे गौरवोद्गार यावेळेस त्यांनी काढले. यावेळी प्रास्ताविक सूत्रसंचालन सुधीर शंकरराव रत्नपारखी यांनी केले आभार सुनील दत्तात्रेय रत्नपारखी यांनी मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद