महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर प्रतिनिधी
लाखो भाविकांची कुलदैवत श्री. क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा या राज्यस्तरीय ब वर्ग तिर्थक्षेत्रावर कोजागिरी पौर्णिमा उत्सव धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी सहा वाजता देवाचे मंगस्नान पूजा, सकाळी सात वाजता अभिषेक महापूजा सकाळी आठ वाजता महाआरती, श्री रावसाहेब झावरे व सौ शीतल झावरे, किरण गायखे व सौ शुभांगी गायखे, श्री दत्तात्रय साळुंखे, श्री प्रभाकर राऊत व श्री बापूसाहेब गायखे यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 9.30 वाजता श्री खंडोबा पालखीचे प्रस्थान मंदिरातून झाले. वाजंत्री ताफ्यासह ढोल लेझीम खेळत भाविक भक्तांनी पालखी मिरवणूक प्रदक्षिणा पूर्ण केली. पालखी पुढे ओलांडा दर्शन घेऊन भावीक भक्त देवाच्या चरणी नतमस्तक होत होते. पालखी विसावा स्थानावरून पालखी पुढे आल्यानंतर पारंपारिक लंगर तोडण्याच्या विधी पालखी पुढे झाला.
यावेळी शेकडो भाविकांनी खंडेरायाचा जयजयकार करून खोबरे भंडाऱ्याची उधळण केली. पालखी मंदिर फरसावर आल्यावर महाप्रसाद अन्नदाते व पुजारी यांच्याकडून पालखीला नैवेद्य अर्पण करण्यात आला. पालखी मंदिरात विराजमान झाल्यावर महाप्रसाद वाटप करण्यात आला. सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा महाप्रसादाचे अन्नदाते भिमाजी शंकर गायखे, पोपट दगडू साळुंखे गुरुजी, प्रभाकर दत्तात्रय राऊत, गजानन शेठ देवराम झावरे सर्व राहणार वासुंदे तालुका पारनेर, पांडुरंग भाडळे राहणार गारखिंडी, अमोल अंञे राहणार जातेगाव बुद्रुक यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. पौर्णिमेनिमित्त कुलदैवताच्या देवदर्शनासाठी दिवसभरात शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. रात्री दुधाचा प्रसाद वाटप करण्यात आला देवस्थान तर्फे पिण्याचे पाणी, दर्शन बारी, वाहने पार्किंग नियोजन होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद