रांधे - प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घेतले विठूरायाचे दर्शन

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी- सागर आतकर

"सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती

रखुमाईच्या पती सोयरिया

गोड तुझे रूप गोड तुझे नाम

देई मज प्रेम सर्वकाळ"

पारनेर तालुक्यातील रांधे येथे आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविका दर्शनासाठी आले होते.असंख्य भाविक दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन कित्येक दिवस पायीवारी करत पंढरपूर येथे माउलींच्या दर्शनाच्या ओढीने असंख्य अडचणींचा सामना करत दरवर्षी पायी जात असतात.ज्यांना आषाढी वारी करता येत नाही असे वारकरी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यातील रांधे येथील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील विठू माउलींच्या दर्शनासाठी येत असतात.

पांडुरंगाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या संत श्री बाळोबा महाराज भाकरे यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वयंभू विठ्ठलरुक्मिणी जिथे प्रकट झाली ती प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी पवित्र भूमी, तमाम वारकरी विठ्ठलभक्तांची प्रतिपंढरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र विठ्ठलवाडी, रांध येथे सर्व वारकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या सहभागासोबत पांडुरंगाच्या कृपेने, बाळोबा महाराजांच्या आशीर्वादाने, याही वर्षी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, सेनापती बापट सेवा मंडळ आणि समस्थ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

या सोहळ्याची सुरुवात पहाटे मुर्तीस अभिषेक, महापूजा आणि काकड आरतीने झाली.

श्री. संदीप आवारी तहसीलदार मुरबाड  यांना या वर्षीचा अभिषेकाचा सपत्नीक मान मिळाला होता.

नंतर विठ्ठलवाडी ते रांधे व रांधे ते विठ्ठलवाडी असा पायी दिंडी सोहळा पार पडला..

दिंडी सोहळ्या नंतर रोहिणीताई काटे यांच्या तर्फे मंजूर झालेल्या पाण्याच्या टाकीचे उदघाट्न करण्यात आले 

दुपारी १ ते ३ यावेळी ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ किसन नगर ठाणे यांचे सुश्राव्य भजन आणि गावोगावाहून येणाऱ्या दिंड्यांचं स्वागत सोहळा पार पडला.

संध्याकाळी ५ ते ७ आळंदी येथील विद्यार्थी वृंद यांचा हरीपाठ कार्यक्रम पार पडला..

रात्री ७ ते ९ यावेळी ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर शिवकथाकार यांचे हरी कीर्तन झाले. 

रात्री ९ वा. एकादशी भोजन फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी दिवसभरात निसर्गरम्य आणि डोंगराच्या सानिध्यातील हिरव्यागार वातावरणात तल्लीन होतं हजारो वारकऱ्यांनी पांडुरंगाच दर्शन घेतल.

यावेळी आलेल्या सर्व भाविकांचे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट ने आभार मानले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top