अक्षरवारी फलक लेखनातून विठुरायांची सेवा

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी : सागर आतकर

वासुंदे गावचे सुपुत्र कलाक्षेत्रात उत्तम कार्य करत असलेले श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थे मधील एक धडाडीचे कलाशिक्षक संतोष पांडुरंग क्षिरसागर यांनी आपल्या हस्तकौशल्याच्या माध्यमातून अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. कलेची आवड असल्यामुळे नेहमीच काही तरी नवीन करण्याची उर्मी संतोष क्षीरसागर सर यांचा मध्ये असते.

आषाढी वारी निमित्त पंढरपूरला भाविक भक्तांची मांदियाळी असते प्रत्येकाला ओढ असते विठूरायला भेटण्याची या निमित्त त्यांनी शाळेत अक्षरवारी फलक लेखनातून विठुरायांची सेवा करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नाला शाळेतून नवे तर संपूर्ण तालुक्यातून लोकांनी पसंती दिलेली आहे. सुंदर लिखाणाद्वारे तसेच उत्कृष्ट चित्रकला द्वारे संतोष क्षिरसागर हे कलाशिक्षक परिसरातील गावोगावी परिचित झाले असून त्यांच्या लिखाणाचे व त्यांच्या सुवर्ण हस्तअक्षराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान संतोष क्षीरसागर सर यांनी आपल्या अंगी असलेली कला जोपासत नेहमीच सामाजिक, वैचारिक विषयांनाही अतिशय महत्त्व दिले आहे. कलेच्या माध्यमातून संतोष क्षीरसागर सर हेच समाज सेवा करत आहे हे वासुंदेकरांचे भूषणच आहे. क्षिरसागर सर यांचे हस्ताक्षर ही सुंदर असून डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही कलाशिक्षक संतोष क्षिरसागर यांनी अडीच वर्षे लिखाण करून ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलिखित लिहिला आहे व त्याही कलेचे संपूर्ण राज्यभर कौतुक झालेले आहे.

या अशा उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, सचिव सुदेश झावरे पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती नरवडे ए. पी. व पर्यवेक्षक श्री. ठुबे ए. के. सर, सरपंच भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, जोगेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन जालिंदर वाबळे, चेअरमन नारायण झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब झावरे, व सर्व शिक्षक वृंद न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे यांनी विशेष कौतुक केलेले आहे.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top