मतदानादिवशी अमरावतीत सार्वजनिक सुट्टी जाहीर

0

 


अमरावती

    भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, कंपन्या व संस्थाना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top