भोंदू अशोक खरात खटला: सरकारतर्फे ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. परिमल फळे मांडणार बाजू

0


महाराष्ट्र दर्शन न्युज / अहिल्यानगर:
देशभर चर्चेत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम, तर त्यांना सहकार्य करण्यासाठी सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून अहिल्यानगर येथील प्रसिद्ध फौजदारी वकील ॲड. परिमल फळे यांची अधिकृत नेमणूक केली आहे.
राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने गुरुवारी (११ जून २०२६) या संदर्भातील अधिकृत अधिसूचना (Notification) प्रसिद्ध केली. या अधिसूचनेवर विधी व न्याय विभागाचे कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांची स्वाक्षरी आहे.
महत्त्वाची पार्श्वभूमी:
  • पूर्वीचे खटले: याआधी राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्याकांड आणि नेवासे येथील ॲड. रियाज पठाण हत्याकांड या दोन्ही मोठ्या खटल्यांमध्ये ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. परिमल फळे यांनी एकत्र काम केले आहे.
  • इतर खटले: ॲड. परिमल फळे हे जिल्ह्यातील गाजलेल्या रेखा जरे खून खटल्यासह इतर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आरोपींच्या बाजूने काम पाहत आहेत.


Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top