गंगाजलाने अभिषेख : वरून राजाला साकडे हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन
टाकळी ढोकेश्वर :(प्रतिनिधी सागर आतकर )
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून ईशान्येस तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री ढोकेश्वरची तिसऱ्या श्रावणी सोमवारी यात्रा मोठ्या आनंदात पारपडली . सोमवारी पहाटे कावडीने आणलेल्या गंगा जलाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर ढोकी गावचे सरपंच बाबासाहेब नर्हे, तबाजी नऱ्हे, पोपट वाघचौरे, आप्पा नऱ्हे हनुमंत खटके, संतोष आल्हाट व मंदिराचे पुजारी यांचे हस्ते पिंडीचे पूजन करून आरती करण्यात आली .
श्री ढोकेश्वरची पुरातन लेणी अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असून इ.स. पूर्व ५५० ते ६०० या कालखंडात ही लेणी तयार झाली असल्याचा इतिहास अभ्यासकांचे मत आहे. हे मंदिर पुरातन व जागृत देवस्थान असल्याने येथे नगर व पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत मंदिर परिसर गजबजून गेला होता. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. हजारो शिवभक्तांनी हरहर महादेव च्या गजराने परिसर दुमदुमन टाकला होता. उंच डोंगरावर असणाऱ्या मंदिरात जाण्यासाठी एकशे साठ पाऱ्या चढावा लागतात त्यामुळे महिला व वृद्धांची दमछाक होत होती .
त्याच प्रमाणे याही वर्षा ग्रामस्था कडुन जंगी कुस्त्याच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते .११ हजार रू कुस्तीने हगाम्याची सांगता करण्यात आली .
शिवभक्तांसाठी टाकळी ढोकेशवर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने खिचडीच्या प्रसादाची व मोफत पाण्याची सोय करण्यात आली होती .
तर कोणताही अनुचित प्रकार घडु नये या साठी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पी .एस आहे . बोत्रे , पो.कॉ. शेळके , पो कॉ . मोकते , पो .कॉ. लोणारे, पो .कॉ. विनोद बोरगे . इत्यादी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद