निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला मिळाला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा दिपस्तंभ 2019 प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

0
निघोज(प्रतिनिधी)-सागर आतकर 
निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा दिपस्तंभ 2019 हा नाशिक विभागातील 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या पतसंस्थांमध्ये  प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आज (रविवारी)दि. 01सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त श्री.सतीश सोनी यांच्या शुभहस्ते  देण्यात आला.



                             नागपुर येथे राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र राज्य सहकार आयुक्त श्री. सतीश सोनी  यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंतराव कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, संस्थेचे जेष्ट संचालक अँड. बाळासाहेब लामखडेमुख्यव्यवस्थापक दत्तात्रय लंके आदींनी हा पुरस्कार स्विकारला.या पतसंस्थेची यापुर्वीही पुरस्कारासाठी निवड झाली होती. हा पुरस्कार मिळाल्यानंतर नाशिक विभागात सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान या पतसंस्थेला मिळाला आहे.
                              ग्रामीण भागातील सभासद, खातेदार व ग्राहकांना माहीती व तंत्रज्ञानाच्या युगात दर्जेदार सेवा देत असताना सभासदांचा विश्वास संपादन करण्यास संचालक मंडळाने प्राधान्य दिल्याने आजच्या स्पर्धेच्या युगातही ही पतसंस्थेची प्रगती दिवसेदिवस झपाट्याने वाढत आहे. ही आभिमानाची गोष्ट असुन सभासद,खातेदार व ग्राहकांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध राहु असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंतराव कवाद यांनी पुरस्कार स्विकारताना सांगितले.
चौकट
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा दिपस्तंभ 2019 हा पुरस्कार आज मी स्विकारला असला तरी हा पुरस्कार मिळण्यामागे खरे श्रेय आहे ते संस्थापक स्व. श्री. बाबासाहेब कवाद व संचालक मंडळ, तसेच या कार्यात सहभागी असलेले संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद, सभासद, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक व विशेष म्हणजे संस्थेचे सर्व उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवणारे आमचे सर्व पत्रकार मित्र. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, शुभेच्छांमुळे आज हा पुरस्कार चौथ्यांदा प्राप्त झाला आहे. अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंतराव कवाद यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top