पारनेर प्रतिनिधी (सागर आतकर)
पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथे एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला.सांगवी सुर्या गावचे सरपंच संदिप रासकर यांचे चिरंजीव कृष्णा रासकर यांच्या सातव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हभप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. आपण आपल्या वंशाचा दिवा म्हणजे मुलगा किंवा मुलगी याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्याआधी मेणबत्ती विझवणे ही परंपरा आपली नाही.वाढदिवसाच्या दिवशी आई वडील व जेष्ठाचे आर्शिवाद घेणे मंदिरात पूजा करणे ही आपली खरी संस्कृती आहे.असे समाधान महाराज शर्मा यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.मनुष्याला जीवनात जर खरच सुखःशांती पाहिजे असले तर प्रथम समाजाचा सन्मान व आदर करण्यास शिकले पाहिजे जो समाजाचा आदर करतो तोच जीवनात यशस्वी व सुखी होऊ शकतो.असे हभप समाधान महाराज शर्मा यांनी यावेळी सांगितले.
सरपंच संदिप रासकर यांनी आज वायफल खर्च टाळून ज्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला त्यामुळे त्यांचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे. सरपंच संदिप रासकर यांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील जेष्ठ माता पिता याचे पाद्य पुजन व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते.या मध्ये सर्व जाती धर्मातील मातापित्यांचे अभिष्टचिंतन करून त्यांचा सन्मान करण्यात आला.असा सोहळा व मानसन्मान पाहून सर्व भारावून गेले होते.संदिप रासकर यांचे अनुकरुण उपस्थित नवयुवकानी करावे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.या कार्यक्रमाला पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या राणी ताई लंके,माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे ,जवळे गावचे उपसरपंच किसनराव रासकर,अण्णासाहेब बढे,बाळासाहेब खोसे,मोहन आढाव,संपत आढाव,गणेश रासकर,भास्कर आढाव,प्राचार्य अनिल साठे,जवळे सेवा संस्था संचालक संभाजी आढाव व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते सांगवी सूर्या येथे एक आगळा वेगळा वाढदिवस..सरपंच संदिप रासकर यांचा अनोखा उपक्रम

चांगला उपक्रम
उत्तर द्याहटवाखुपच छान उपक्रम
उत्तर द्याहटवा