वडनेरच्या आजीसाठी डॉ.श्रीकांत पठारे धावले देवदुता सारखे.

0
प्रतिनिधी / निघोज
कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण देशभरात संचार बंदी लागू केली असली तरी अत्यावश्यक सेवेत येणारे खासगी, सरकारी हॉस्पिटल, मेडिकल उघडे ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. हा विषाणू इतका भयानक असल्याने डॉक्टर देखील आपल्या जीवाचा विचार करत दवाखाने बंद ठेवत आहेत. बुधवारी (दि.१) रोजी निघोज येथे वडनेर येथून आलेल्या वृद्धेचा उपचारासाठी एकही दवाखाना चालू नसल्याने उपचाराची गैरसोय झाली. ही माहिती पारनेर येथील डॉ.श्रीकांत पठारे यांना मिळताच त्यांनी तत्काळ त्या आजीच्या घरी जाऊन उपचार केले. अजूनही माणुसकी धर्म जिवंत असल्याचा आदर्श डॉ.पठारे यांनी घालून दिला.
वडनेर येथे जाऊन आजींच्या तब्येतीची विचारपूस करून उपचार करताना डॉ.श्रीकांत पठारे.
( छाया- चंद्रकांत कदम )

कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. त्यात निघोज मधील सर्व खाजगी व सरकारी दवाखाने बंद आहेत. वडनेरच्या वाजेवडीतील वृद्ध आजी खूप आजारी असल्याने  सकाळपासून उपचारासाठी आजीच्या नातेवाईकांनी निघोज मधील अनेक दवाखान्यांमध्ये जाऊन उपचारासाठी घरी येण्याची विनवणी केली. परंतु दवाखाने बंद असल्याने उपचार होऊ शकला नाही. नातेवाईक सरकारी दवाखान्यात देखील जाऊन आल्या परंतु तेथे देखील त्यांच्यावर उपचार झाला नाही. अखेर हताश झालेल्या आजींच्या नातेवाईकांनी माहिती पारनेर येथील ओंकार हॉस्पिटल चे संचालक व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे यांना दिली. डॉ.पठारे यांनी तत्काळ पारनेर मधून स्वतःच्या गाडीत जाऊन त्या आजींना वडनेर (वाजेवाडी) येथे जाऊन उपचार केले. तुम्ही देवदुतसारखे धावून आलात असे त्या आजींनी डॉ.श्रीकांत पठारे यांना म्हणल्या.
एकीकडे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने सर्व दवाखाने 24 तास खुले ठेवण्याचे आदेश दिले असताना सरकारी दवाखाना देखील सुरू नव्हता असे आजींनी डॉ.पठारे यांना सांगितल्यावर डॉ.पठारे यांनी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना फोन करून चांगलीच कान उघाडणी केली. डॉ पठारे यांनी पारनेर वरून सुमारे 30-35 किमी अंतरावर स्वखर्चाने जाऊन त्या आजींवर घरी उपचार केले त्यामुळे डॉ पठारे यांचे सर्वत्र आभार मानण्यात येत आहे.  डॉ पठारे हे सध्या घरोघर जाऊन कोरोना विषाणू वर मार्गदर्शन करून रुग्णांना घरी जाऊन उपचार देत आहेत.
जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध - डॉ श्रीकांत पठारे आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत याचे सर्व डॉक्टरांनी भान ठेवले पाहिजे. अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. मी जनतेच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असून कुठल्याच रुग्णाची गैरसोय होऊ देणार नाही. गैरसोय होणार्‍या रुग्णांनी माझ्याशी संपर्क करावा आपल्याला वैद्यकीय सेवा पुरविली जाईल असे आवाहन डॉ श्रीकांत पठारे यांनी केले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top