गोरगरिब मायमाउलीना गोरेगावच्या तरुणांचा आधार

0
प्रतिनिधी / पिंपरी-जलसेन
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे गोरगरीब जनतेचे हाल होत असताना तालुक्यात गोरगरिबांना मायेचा हात देण्याचा निर्णय शिवबा संघटना/प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घेण्यात आला. अन त्याचीच आमलबजावणी म्हणून गोरेगाव व आजुबाजुच्या गावातील मायमाउली ना आधार देण्यासाठी प्रेरणा प्रतिष्ठान, दिशा फाउंडेशन, नवयुग मित्र मंडळाचे तरुण सरसावले व ४० ते ५० कुटुंबाना किराणा मालासह भाजीपाला मोफत पुरण्यात आला. खर्‍या अर्थाने गरजु पर्यंत मदत पोहचवुन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे संपूर्ण गावात सॅनिटायझरची २-३ दिवस स्वखर्चाने फवारणी केली. तरुणांच्या या विविध उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत असून त्याचबरोबर ग्रामस्थानी हि प्रेरणा प्रतिष्ठानचे कौतुक केले. यावेळी या उपक्रमात प्रितेश पानमंद, नागेश नरसाळे, प्रवीण नरसाळे, अनिल नरसाळे पाटील, मयुर पातारे, तुषार नरसाळे, निलेश नरसाळे, परवेज शेख,  आदिनी सहकार्यानी योगदान दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top