पारनेर तालुक्यातील बारा गावांचे टँकर प्रस्ताव मंजूर - सभापती गणेश शेळके

0
पारनेर - पारनेर तालुक्यातील बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून प्रांत अधिकारी कार्यालयातून मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सभापती गणेश शेळके यांनी दिली आहे.
पारनेर तालुक्यातील भोंद्रे, पळशी, विरोली, जामगाव, कर्जुले हर्या, पुणेवाडी, वेसदरे, पिंपरी पठार, पिंपळगाव रोठा, काळकुप, कान्हूरपठार, दैठणे गुंजाळ यातील सहा गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहे. तर उर्वरित सहा गावांचे प्रस्ताव उद्यापर्यंत मंजूर होतील त्यामुळे १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

उन्हाळा सुरू झाल्यामुळे गावांमधील टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयामध्ये ग्रामपंचायत स्तरावरून दाखल करण्यात आले होते हे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले होते, मात्र त्यातील काही प्रस्ताव त्रुटी असल्याने पुन्हा दि २७ रोजी सभापती गणेश शेळके व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी बैठक घेऊन यातील त्रुटी दूर करून ते प्रस्ताव पुन्हा प्रांताधिकारी कार्यालयात सादर केले. तसेच सभापती गणेश शेळके यांनी प्रांतअधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क करत या प्रस्तावाबाबत माहिती देऊन तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये त्वरित टँकर मंजूर करावे अशी मागणी काय केली. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी त्वरित प्रस्तावाला मान्यता देत प्रस्ताव मंजूर केले आहेत. अशी माहिती सभापती गणेश शेळके यांनी दिली आहे. अजूनही तीन गावांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आलेले असून हे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तसेच ज्या गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे, त्यांनी पंचायत समिती मध्ये प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन तालुक्यातील ग्रामपंचायतींना सभापती गणेश शेळके यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top