पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, भोंद्रे, जामगाव, वेसदरे, पिंपळगाव रोठा, विरोली, पुणेवाडी, काळकूप पळशी, कर्जुले हर्या, दैठणे गुंजाळ व म्हसोबा झाप या गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर लवकरात लवकर चालू करावे याबाबत संबंधित गावातील नागरिकांनी आमदार निलेश लंके साहेब यांच्या सोबत दूरध्वनीद्वारे संपर्क करून व लेखी स्वरूपात पत्रव्यहार करून पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करून आमच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी केली होती.सोमवारी या संदर्भात मा.आमदार निलेश लंके यांनी उपविभागीय अधिकारी मा.सुधाकरजी भोसले साहेब यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करून लवकरात लवकर वरील संबंधित १२ गावांना तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करण्याबाबत सांगितले.
तसेच सदर टँकर चालू करण्यासाठी उपसभापती सौ.सुनंदाताई धुरपते यांनी सुद्धा संबंधित विभागाशी चर्चा करून पाण्याचे टँकर चालू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
वरील सर्व १२ गावासाठी टँकर चालू करण्या बाबतचे मंजुरीचे पत्र मिळून जाईल.असे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
तरी संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच किंवा नागरिकांना कळवण्यात येते की पाण्याच्या टँकर मंजुरी बाबतचे पत्र आपणास हवे असेल तर आपण आमदार निलेश लंके साहेब यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन ही यावेळी आमदार लंके यांच्या कार्यालयाकडून टंचाईग्रस्त गावांना करण्यात आले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद