नातेवाईकांची गाडी जाऊ न दिल्याने चाळीसगाव- नांदगाव सीमेवर चेकपोस्टवर बंदोबस्त करणाऱ्या पोलीस पथकावर हल्ला

0
नाशिक : चाळीसगाव- नांदगाव सीमेवर चेकपोस्टवर बंदोबस्त करणाऱ्या पोलीस पथकावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचे कारण नातेवाईकांची गाडी जाऊ दिली नाही म्हणून संबंधित व्यक्तीने गावातून टोळी बोलावून पोलीस पथकावर हल्ला चढविला. 
या हल्ल्यात नांदगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्या डोळ्याला मार लागल्याचे देखील समजते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी फाडली तसेच खुर्च्यांचीही तोडफोड झाल्याची माहीती मिळत आहे. नांदगाव चाळीसगाव चेक पोस्ट वर २५ ते ३० लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. या हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top