नाभिक बांधवांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी - सुनील जाधव (नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष)

0
पारनेर ( निघोज ) : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. या लॉकडाऊनला सर्वांनी प्रतिसाद देत कोरोना बरोबरच्या लढाईत आपले योगदान दिले.  
नाभिक समाजाने ही या लॉकडाउन काळात आपली दुकाने बंद करून कोरोनाशी लढा दिला आहे.परंतु नाभिक समाजाच्या अडचणींकडे आजतागायत कोणत्याही नेत्याने किंवा अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील सलून व्यावसायिकांची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली.
परंतु अजूनही पारनेर तालुक्यात सलून व्यसायिकास परवानगी दिली नसून काही अटी व शर्तीवर सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी समाजातून होत आहे .त्याच बरोबर व्यवसाय सुरू करताना सलून व्यावसायिकाच्या आरोग्याचा प्रश्न हा ऐरणीवर येणार आहे. दुकान सुरू करण्यापूर्वी प्रत्येक सलून व्यावसायिकाच्या आरोग्याचा त्याच बरोबर गिऱ्हाईकांच्या आरोग्याचा प्रश्न ही उद्भवू शकतो यासाठी संपूर्ण नाभिक सलून व्यावसायिकांसाठी वैद्यकीय सेवेत देण्यात येणारे सुरक्षा किट, चष्मा, हॅन्डग्लोज, ड्रेस इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी तसेच भाडे तत्वावर असणारे दुकानाचे भाडे हे माफ करावे अशी मागणी होत आहे.


पारनेर तालुक्यातील निघोज येथे आज दि ०५ रोजी नाभिक समाजाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत ,प्रदेश कार्यकारी सदस्य विकास मदने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव यांच्या वतीने सोशल डिस्टनसिंग चे पालन करत धोंडिभाऊ राऊत, सुखदेव राऊत, मनोहर राऊत, शहाजी आतकर, नवनाथ राऊत, प्रवीण राऊत, शांताराम राऊत, शशिकांत राऊत, बाळू राऊत, सुभाष आतकर, पोपट राऊत, राजेश राऊत, जेष्ठ सोन्याबापु जाधव, विश्वनाथ जाधव, जिजाबापू जाधव, रवी जाधव, गणेश जाधव, प्रकाश जाधव, तात्याभाऊ राऊत, कैलास राऊत, विजय राऊत यांना सॅनिटायझर व नॅपकिनचे वाटप केली.
निघोज, जवळा, गुणोरे येथील नाभिक बांधवांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी - सुनील जाधव (नाभिक समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top