मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट इंडियाकडून १० हजार पीपीई कीट वाटप

0

मुंबई, दि. ११ : कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे, स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट इंडियाचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिशिर जोशी यांनी १० हजार खाकी रंगाचे पीपीई कीट भेट दिले.


कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी निश्चितच पोलीस विभागाला ही कीट अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी या भेटी बद्दल स्टार इंडिया व प्रोजेक्ट इंडियाचे गृह विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top