नंदुरबार दि.२८ : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील 1518 विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य 70 मजूर असे 1588 प्रवाशांना विशेष श्रमिक एक्स्प्रेसने झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी व सुमना पंत, अविश्यांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी व सुमना पंत, अविश्यांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजूरांमध्ये नंदुरबार येथील 26, तळोदा 7, नवापुर 18 , शहादा 12 तसेच साक्री येथील 7 अशा 70 मजूरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजूरांना घेवून गुवाहाटीच्या दिशेने 2 वाजून 40 मिनीटांनी रवाना झाली. यावेळी श्री.पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना बसमधून उतरवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्वांना रेल्वेत बसविण्यात आले.
जामिया मार्फत सर्व प्रवाशांना पिण्याचे पाणी, भोजन सामुग्री आणि मास्क उपलब्ध करून देण्यात आले होते. आपल्या मूळ गावी जात असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर अत्यंत आनंद दिसत होता. सर्व प्रवाशांनी पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी तसेच शासन व प्रशासनाचे विशेष आभार मानले .
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद