पारनेर । दि.२६ : तालुक्यातील सुपा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ अंतर्गत पारनेर तालुका नाभिक सलून असोसिएशन ची स्थापना करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष पदी घनश्याम कारले, कार्याध्यक्ष पदी दीपक शिंदे, उपाध्यक्ष पदी निलेश गायकवाड, सचिव पदी अविनाश पंडित, सहसचिव पदी मंगेश काळे तर सदस्यपदी गोरख राऊत व प्रितेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच पारनेर असोसिएशन युवक संघटना कार्यकारणी ही यावेळी जाहीर करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष पदी प्रसाद भोसले, उपाध्यक्ष पदी राहुल काळे, सचिव पदी मंगेश कार्ले तर सहसचिव पदी मच्छिन्द्र वाघमारे यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व नाभिक बांधव उपस्थित होते. यानिमित्ताने पारनेर तालुका नाभिक संघटनेच्यावतीने सर्व नाभिक बांधवांना आमदार निलेश लंके व नाभिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या उपस्थितीत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शामराव जाधव, तालुका अध्यक्ष भाऊ भिडे, उपाध्यक्ष श्याम साळुंखे, जिल्हा युवक अध्यक्ष निलेश पवळे, डॉ. बाबासाहेब कावरे, सचिव विनायक कुटे, सहसचिव सुनील आतकर, माऊली कोरडे, संजय वाकचौरे यांच्या शुभहस्ते तालुक्यातील नाभीक बांधवांना सुरक्षा किट वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व नाभिक बांधव उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद